स्थानिक उद्योगांना जागतिक होण्यास मदत करणारी संस्था – फ्रंचाइज इंडिया

पुणे दि. १ ५ एखाद्या उद्योजकाला व्यावसायिक सल्ला , वितरण यंत्रणा कशी उभारावी इथपासून ते भांडवल कसे मिळवावे याची एकाच छत्राखाली माहिती आणि सेवा देणारी आन्त्र्प्रेन्युअर कॅफे ही संकल्पना चालू आर्थिक वर्षात भारतात सुरु केली जाणार आहे आणि त्याचा प्रारंभ मुंबई आणि पुण्यात केला जाणार आहे अशी माहिती आशियातील सर्वात मोठ्या फ्रंचाइज इंडिया कंपनीचे अध्यक्ष गौरव मार्य यांनी आज येथे दिली. कंपनीने लघु उद्योग विकास बँक ( सिडबी ) या सरकारी मालकीच्या बँकेशी त्यासाठी सहकार्य करार केला असून त्याद्वारे कर्ज सुविधा मिळवून दिली जाते.

सध्याच्या मंदीत फ्रंचाइजी तत्वावर चालणारा व्यवसाय वेगाने वाढतो आहे अशी माहिती देऊन ते म्हणाले की भा रताची बाजारपेठ एक लाख दहा हजार कोटी रुपयांची आहे. जागतिक पातळीवर ती तीन लाख कोटी डॉलर इतकी आहे यावरून भारतात व्यवसाय वाढीस किती वाव आहे हे लक्षात येते. भारतात या व्यवसायाची सरासरी वाढ ३ ० टक्के आहे. मात्र ती मोठ्या शहरात केंद्रित झालेली आहे. आज छोट्या आणि मध्यम आकाराच्या व्यावसायिकांना वाढू देण्यासाठी सरकारचे स्पष्ट धोरण नाही. त्यांना भांडवल उभारणे मुश्किल जाते. यासाठी केंद्र आणि राज्ये यांनी स्वतंत्र आणि स्पष्ट धोरण आखायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त करून ते म्हणाले की खेड्यातील छोट्या उद्योजकाला स्थानिक भाषेत , संस्कृती लक्षात घेऊन तसेच स्थानिक परिस्थितीचा विचार करून पोषक ओद्योगिक सुविधा मिळवून देणे यास आम्ही आम्ही प्राधान्य देत आहोत.

एकट्या पुण्याचा विचार केला तरी देशाच्या एकूण क्षमतेपैकी १ ५ टक्के म्हणजे १ ५ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय या शहरात होतो. वाढत्या मध्यमवर्गाने त्यात भर पडते आहे. सेवा आणि किरकोळ विक्री हा देशात मोठ्या प्रमाणात रोजगार पुरवू शकतो हेही लक्षात घ्यायला हवे. केवळ आमच्या कंपनीची उलाढाल १ ० ० कोटी रुपये आहे अशी माहिती देऊन ते म्हणाले की ही संधी लक्षात घेऊन देशभर आणखी २ ५ आन्त्र्प्रेन्युअर कॅफे येत्या तीन वर्षात सुरु केले जातील. महाराष्ट्रातील आणखी सहा ते दहा शहरात फ्रंचाइज इंडिया एक्झिबिशन त्यांचा सेवाविस्तार करणार आहे असे यावेळी मुख्याधिकारी आशा जेमिनी शरण यांनी सांगितले.

पुण्याचे लोकल होणार ग्लोबल
पुण्यातील काका हलवाई ( सचिन गाडवे ), मलाका स्पा इस( प्रफुल चंदावरकर) , द क्लोदिंग (सागर गुजर ), निक्स ( निखिल बोत्रे ), ए बी एस फिटनेस ( अभिमन्यु साबळे ) फिलीट ट्रेनिंग ( नयन चोपडे ) यांना जागतिक स्तरावर व्यवसाय वाढीसाठी फ्रंचाइज इंडिया माध्यमातून संधी मिळते आहे.