प्राचार्य भोसले हे विचारांचे विद्यापीठˆ-डॉ माशेळकर

पुणे, दि. 15 (प्रतिनिधी) – प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी महाराष्ट्रात स्वामी विवेकानंद व कर्मवीर भाउराव पाटील यांचा संदेश प्रत्येक तरुणाच्या हृदयापर्यंत पोहोचवला. यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार म्हणजे गुरूपोर्णिमेच्या आधीच गुरूंनी दिलेला आशीर्वाद होय, अशी कृतार्थ भावना डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी प्राचार्य शिवाजीराव भोसलेपुरस्कार स्वीकारताना व्यक्त केली.हा सन्मान ज्येष्ठ साहित्यिक डॉ.द.भि.कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आला.

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्याच प्रमाणे भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रा.डॉ. शिवाजीराव कदम, महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत, समितीचे अध्यक्ष प्रा. मिलींद जोशी, खजिनदार रंजना भोसले आदी उपस्थित होते. अकरा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल व श्रीमळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. डॉ. माशेलकर म्हणाले पुढे , प्राचार्य भोसले यांचे रुप, भाषेवरील असामान्य प्रभुत्व, ओघवती भाषा यामुळे मी त्यांचा शिष्य झालो. आचार, विचार, समन्वय हे प्राचार्यांनी सांगितले. प्राचार्य हे विचारांचे विद्यापीठ होते वैज्ञानिक संशोधनाचा फाायदा सामान्य गरिबांना व्हायला हवा, वैज्ञानिकांनी देखील असे संशोधन करायला हवे,असे ते म्हणाले. यावेळी माशेलकर यांनी प्राचार्य भोसले यांच्या जीवनवेध पुस्तकातील त्यांच्याविषयी लिहिलेला भाग वाचून दाखविला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्राचार्य, यक्षप्रश्न या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

डॉ. द.भि.कुलकर्णी म्हणाले, साहित्य, संस्कृती, ज्ञान याचे एकीकरण प्राचार्य भोसले यांच्या वक्तृत्वात होते. प्राचार्यांना मानव जातीवर सुसंस्कार करायचे होते. साहित्य काल्पनिक तर विज्ञान रुक्ष आहे. मानवी सुखाचा शोध विज्ञान व आत्मज्ञान या दोन्ही मार्गाने घेतला जातो. डॉ. माशेलकर हे आधुनिक विज्ञानाचे प्रतिपादक आहेत. डॉ. माशेलकर हेे सामान्यतल्या सामान्य माणसाला सुखी करण्यासाठी संशोधन करतात, त्यांचे कार्य हे असामान्य आहे. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले म्हणाले, प्राचार्य भोसले हे निर्मळ, निरपेक्ष, स्वच्छ व्यक्तीमत्व होते. त्यांचा सहवास मला लाभला आणि माझ्यात बद झाला. चांगल्या गोष्टी जपून ठेवणे समाजाच्या सांस्कृतिक जीवनात महत्त्वाचे आहे. शिक्षणयंत्रणेमध्ये विद्यार्थ्यांच्या नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात खूप जण काम करतात, पण त्यांच्याबद्दल अनुकूल मत नाही. अनेक वैज्ञानिकांना समाजाबद्दल जाणीव नाही. मार थोड्याजणांना लोकोपयोगी संशोधन करावे असे वाटते, त्यामधील डॉ. माशेलकर एक आहेत. हळद, बासमती तांदूळ यांचे पेटंट भारताकडे राहावे यासाठी डॉ. माशेलकर लढत आहेत. हे पेटंट भारताकडे ठेवणे हे असंख्य पिढ्यांसाठी वरदान ठरणार आहे. कथा माझ्या वक्तृत्वाची ही प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा वक्तृत्वप्रवास उलगडून दाखविणारी ध्वनीचित्रमीत दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलींद जोशी यांनी केले, तर विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Comment