जोधपूर – भारतीय वायुसेनेचे मिग-21 बायसन लढाऊ विमान कोसळून पायलट जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. राजस्थानमधील उत्तरलाई येथे आज सकाळी ही दुर्घटना घडली.

जोधपूर – भारतीय वायुसेनेचे मिग-21 बायसन लढाऊ विमान कोसळून पायलट जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. राजस्थानमधील उत्तरलाई येथे आज सकाळी ही दुर्घटना घडली.
आज सकाळी 9.30 वाजता उत्तरलाई येथील तळावर हे विमान उतरत असताना हा अपघात झाला. या दुर्घटनेत वैमानिक जागीच ठार झाला आहे. याप्रकरणी चौकशीचे
आदेश देण्यात आले असून अपघाताची कारणे शोधण्यात येतील अशी माहिती वायुसेनेचे प्रवक्ते एस. डी. गोस्वामी यांनी दिली.
गेल्या महिन्यातही या तळावरुन उड्डाण केलेले मिग-21 विमान कोसळले होते. वैमानिकाने वेळीच बाहेर उडी घेतल्याने तो बचावला होता. नियमित सराव करून परतताना आजची दुर्घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे.
भारतीय वायुसेनेने गेल्या 40 वर्षांमध्ये 900 पेक्षा जास्त मिग-21 विमाने विकत घेतली. त्यापैकी अर्धी विमाने कोसळली आहेत. आजचा अपघात हा यावर्षीचा
सहावा अपघात आहे.