
मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणार्या दहावी, बारावीच्या सप्टेंबरमधील लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या दोन्ही वर्गाच्या परीक्षांची सुरूवात 25 सप्टेंबर रोजी होणार आहे. या परीक्षेच्या संदर्भातील सर्व माहिती शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.
दहावीची परीक्षी 25 सप्टेंबर पासून ते 17 ऑक्टोबरपर्यंत चालेल तर बारावीची परीक्षा नऊ ऑक्टोबर रोजी संपणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे विभागीय प्रभारी सचिव सु.बा.गायकवाड यांनी दिली. दहावी, बारावीच्या श्रेणी व तोंडी परीक्षा ही 11 ते 21 सप्टेंबर दरम्यान होतील. तर याच दरम्यान दहावीची तंत्र व पूर्व व्यावसायिक परीक्षा 11 ते 14 सप्टेंबर या कालावधीत घेतली जाईल. यात विज्ञान व तंत्रज्ञान विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा ही संबंधित परीक्षा केंद्रावरच घेण्यात येईल.
