बॉम्बस्फोटप्रकरणी एका संशयीतास अटक

नवी दिल्ली – बोधगया येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर सोमवारी इंडियन मुजाहिद्दीनच्या संशयित दहशतवाद्याला बिहार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजचीही मदत घेण्यात येणार आहे. या आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याने या बॉम्बस्फोटप्रकरणी धागेदारे हाती लागण्याची शक्यता आहे.

बोधगया येथे महाबोधी मंदिरावर रविवारी झालेल्या बॉम्बस्फोटानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि बिहार पोलिसांचे पथक कसून चौकशी करत आहेत. मंदिर परिसरातून विनोद मिस्त्री नावाच्या व्यक्तीचे ओळखपत्र सापडले आहे. या ओळखपत्रावरुन संबंधित व्यक्तीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बोधगया मंदिराच्या आवारात रविवारी पहाटे एक ते दोनच्या सुमारास काही संशयित व्यक्ती तेथे आल्या होत्या असे कळते आहे. या आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याने या बॉम्बस्फोटप्रकरणी धागेदारे हाती लागण्याणची शक्य ता आहे. पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या आरोपीची कसून चौकशी सुरु आहे.