पोर्ट ऑफ स्पेन- रविवारी सामन्या दरम्यान पाऊस पडल्याने तिरंगी क्रिकेट स्पर्धेतील वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यातील रविवारची लढत सोमवारी पुढे खेळवली जाणार आहे. येथे येणाया पावसामुळे या तिरंगी मालिकेत एकदिवस राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हा सामना सोमवारी खेळविण्यात येणार आहे. मात्र आज पुन्हा पाउस आला तर दोन्ही संघांना समान गुण देण्यात येतील.
तिरंगी क्रिकेट स्पर्धेतील वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यातील रविवारची लढत सोमवारी पुढे खेळवली जाणार आहे. पाऊस पडल्याने १९ षटकांनंतर सामना थांबवण्यात आला. त्यावेळी लंकेने ३ बाद ६० धावा केल्या होत्या.
सोमवारी राखीव दिवस असल्याने सामना पुढे खेळवला जाईल. मात्र सोमवारीही सामना पूर्ण न झाल्यास गुण विभागून दिले जातील. या स्पर्धेच्या साखळीतील शेवटच्या लढतीत मंगळवारी श्रीलंका भारताशी दोन हात करेल. सोमवारी सामना पुढे खेळवला जाणार असल्याने दोन्ही संघाची दमछाक होईल.