सिकंदराबादमध्ये हॉटेल कोसळून सहा जण ठार

सिकंदराबाद – येथील हॉटेल म्हणून वापरात असलेली एक इमारत सोमवारी सकाळी कोसळली. या दुर्घटनेत सहा जणांचा बळी गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. याठिकाणी जोमाने मदत कार्य सुरू असून अनेक जखमींना उपचारार्थ हॉसिपटलमध्येस दाखल करण्यात आले आहे. इमारतीच्या ढिगा-याखाली अजून अनेकजण दबले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मातीचा ढिगारा हटविण्यासाठी तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले असून, ढिगा-याखाली अडकलेल्या व्यक्तींना जवळच्या रुग्णालयात हलविण्यात येते आहे. इमारतीखाली सापडून सहा जणांचा बळी गेला असून, आतापर्यंत ११ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती हैदराबादचे पोलिस आयुक्त अनुराग शर्मा यांनी दिली.

दोन मजली असलेली ही इमारत सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळली. तिथे सिटी लाईट नावाचे हॉटेल होते. याठिकाणी जोमाने मदत कार्य सुरू आहे. इमारतीच्या ढिगा-याखाली अजून अनेकजण दबले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.