सांगलीत मतदानाला सुरूवात

सांगली : सांगली- मिरज महापालिकेसाठी रविवारी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. मतदान सुरू होण्यापूवीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. वॉर्ड क्रमांक २२ मधील निवडणूकीचा निकाल मतदानानंतर लगेचच रविवारी संध्याकाळी लागणार होता. मात्र तेथील काँग्रेस उमेदवाराचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. शामराव मुळके असे मरण पावलेल्या कॉग्रेस उमेदवाराचे नाव आहे. त्यामुळे या प्रभागातील निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. सांगली पालिकेच्या निवडणूकीचा निकाल सोमवारी लागणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सांगली महापलिकेतील या प्रभागाचा निकाल आधी म्हणजे रवीवारी निवडणूकीनंतर लागणार होता. पण त्याआधीच उमेदवाराचे निधन झाल्याने या प्रभागातील निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेसाठी मतदानाला रविवारी सुरुवात झाली आहे. त्यामुळे मतदार राजा आज आपले मत कुणाच्या झोळीत टाकणार याची उत्सुकता प्रत्येक उमेदवारासह कार्यकर्त्यांना लागली आहे. या मतदानाचा निकाल आठ जुलै म्हणजेच सोमवारी लागणार आहे.