मुंबई – कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमवर तळोजा तुरुंगात झालेल्या हल्ला प्रकरणात आज (शुक्रवार) आज चार पोलिस कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले. या हल्ल्यात अबू सालेमच्या हाताला गोळी लागली होती. हल्ल्यानंतर अबू सालेमला नवी मुंबईच्या एमजीएम रूग्णालयात उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून कुख्यात गुंड देवेंद्र जगताप याने हा हल्ला केला आहे.
सालेम हल्ला प्रकरणात चार पोलिस कर्मचारी निलंबित
मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर तुरुंग प्रशासनाने युनिट 2 चे अधिकारी संजय साबळे, कर्मचारी चंद्रकांत पठारे, नितीन सावंत, गीतेश रणदिवे अशी या निलंबित कर्मचार्यांची नावे आहेत. या हल्लानंतर अबू सालेमच्या वकीलांनी पोर्गूगीज सरकारकडे सालेम यांचे हस्तांतरण रद्द करण्यासाठी अर्ज करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच बरोबर सालेमच्या वकिलांकडून अबूला भारतीय तुरुंगात धोका असल्याची याचिकाही मुंबई कोर्टात दाखल करण्याची शक्यता आहे. अबू सालेमने देवेंद्र जगताप याच्याशी झालेल्या वादाचा इन्कार केला, असून आमच्या दोघात कसल्याच प्रकारचे वाद न झाले असल्याचे सांगितले आहे.
