मुंबई – तळोजा येथील कारागृहात कुख्यात गुंड अबू सालेम याच्यावर सुरक्षा व्यवस्थेतील ढिसाळपणामुळे हल्ला झाल्याचे उघड झाले आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्यावर हल्ला झाला होता. या घटनेच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले होते. सालेमवर झालेल्या हल्लयाचा अहवाल कारागृह विभागाने गृहविभागाला सादर केला. सुरक्षेतील त्रुटींमुळे हा हल्ला झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी चार पोलिसांना निलंबित करण्यात आले होते.
तळोजा कारागृहात २७ जून रोजी अबू सालेमवर रोजी देवेंद्र जगताप ऊर्फ जेडी याने गोळीबार केला होता. त्यानंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या प्रकरणी खातेनिहाय चौकशी करून या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार, चौकशी करेन हा अहवाल गृहविभागाला सादर करण्यात आला आहे. याबाबत अतिरिक्त महासंचालक (कारागृह) मीरा बोरवणकर यांना विचारले असता, त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या प्रकरणी चार पोलिसांना निलंबित करण्यात आले होते. सुरक्षेतील त्रुटींमुळेच जेडीला हा हल्ला करणे सहज शक्य झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.