उत्तराखंडमध्ये पुन्हा अतिवृष्टीचा इशारा

नवी दिल्ली : महाप्रलयाचा तडाखा सहन करीत असलेल्यास उत्तराखंडमध्ये येत्या ४८ तासात पुन्हा अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे इथली परिस्थिती आणखीनंच बिघडण्याची चिन्हे आहेत. गेल्यास काही दिवापासून बरेच जण याठिकाणी अडकून पडले आहेत. त्‍यांना सोडविण्याचे काम यु़ध्दपातळीवर सुरू आहे.

येत्याच काळात होत असलेल्यास या अतिवृष्टीचा बचावकार्यावर परिणाम होणार असून नागरिकांना बाहेर काढण्याचे आव्हान लष्कारासमोर असणार आहे. कालपर्यंत १५ हजार नागरिकांना बाहेर काढण्याचे आव्हान लष्करासमोर होते. येथील काही जणांना सुरक्षीतसथळी हालविण्यात आले आहे. अन्य काही जणांना याठिकाणहून काढण्याचे काम सुरू आहे.

गेल्या काही तासापासून खराब हवामान आणि धुक्याचा अडथळा येत आहे; यामुळे दिवसभारातील हे उद्दीष्ट पूर्ण होऊ शकेल की नाही याबाबत शका व्यक्त केली जात आहे. थोड्याच वेळात हवामानाचा आढावा घेऊन बचावकार्याची दिशा ठरवली जाणार असल्याचे समजते.