दहिसरमध्ये इमारत कोसळल्याने दोघांचा मृत्यू

मुंबई – दहिसरमध्ये इमारत कोसळून झालेल्या अपघातामध्ये दोन जण ठार झाले तर आठ जण जखमी झाले आहेत. जखमींना भगवती रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना आज सकाळी घडली. मुंबईतील इमारत कोसळण्याची ही या आठवड्यातील तिसरी घटना आहे.

दहिसर पुर्वेला असणारी ‘पियुष’ ही चार मजली इमारत आज कोसळली. या इमारतीमधील रहिवाशांना यापूर्वीच दुसरीकडे हालवण्यात आले होते. मात्र सोसायटीचा वॉचमन आणि त्याचं कुटुंब ढिगा-याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

पावसामुळे मुंबईतील इमारत कोसळण्याची ही या आठवड्यातील तिसरी घटना आहे. शुक्रावरीच मुंब्र्यामधील ‘स्मृती’ ही ३ मजली इमारत कोसळली होती. त्यामध्ये दहा जनचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असताना ही आणखी एक घटना घडली.