भारतात महिलांचा ऑनलाईन शॉपिंगचा धुमधडाका

मुंबई दि.21 – गुगलने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात भारतात इंटरनेट युजरची संख्या 15 कोटीवर गेली असून त्यात महिला युजरचे प्रमाण 40 टक्के इतके असल्याचे दिसून आले आहे. दररोज साधारण 2 ते 4 कोटी महिला इंटरनेट लॉगइन करतात आणि रोजच्या जीवनात इंटरनेटचा वापर करतात असेही दिसून आले आहे. ईमेल, सोशल मिडिया, ऑनलाईन शॉपिं’ग, सर्च, म्युझिक डाऊनलोड करणे, नोकरीचा शोध, व्हिडीओ पाहणे, शैक्षणिक माहिती, बातम्या पाहणे यासाठी महिला इंटरनेट वापरतात आणि घरातून, सायबर कॅफे , कार्यालयातून अथवा स्मार्टफोन वापरून त्या आवश्यक माहिती मिळवतात असेही या सर्वेक्षणात दिसून आले असल्याचे गुगल इंडियाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजन आनंदन यांनी सांगितले.

राजन म्हणाले की इंटरनेट वापरणार्‍या महिलांत तरूण महिलांची संख्या मोठी आहे. त्यातही सर्च कॅटेगरी वापरणार्‍या महिला कपडे, अ‍ॅक्सेसरीज यांच्या संबंधिच्या साईटना सर्वाधिक प्राधान्य देतात. त्यानंतर खाणे पिणे, बेबी केअर, हेैअर केअर, स्कीन केअर या गोष्टींचा नंबर लागतो. फास्ट ट्रॅक, तनिष्का, फॅब इंडिया हे भारतीय बँ्रड महिला सर्चमध्ये आघाडीवर आहेत तर कोकाकोला, अमूल, कॅटबरी हे फूड अ‍ॅन्ड ब्रेव्हरीज मध्ये तर हेअर केअरमध्ये लॉरियाल, लिव्हॉन आणि इ्रेस्मे ब्रँड आघाडीवर असल्याचेही दिसून आले आहे.

भारतात ऑनलाईन शॉपिंग करणार्‍यांची संख्या 10 लाख धरली तर त्यात महिलांची संख्या 5 लाख आहे. विशेष म्हणजे महिला आपण केलेल्या ऑनलाईन शॉपिंगची माहिती अन्य महिलांना सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून देतात, अन्य वस्तूंची चौकशीही एकमेकींकडे करतात आणि खरेदीकरण्यापूर्वी चार ठिकाणी चौकशी करून आणि माहिती मिळवूनच खरेदी करतात असेही यात आढळले आहे.
———

Leave a Comment