डेहेराडून, दि.20: गेले पाच दिवस सुरु असलेल्या संततधार पावसामुळे उत्तराखंड राज्यावर आलेली आपत्ती राष्ट्रीय आपत्ती झाली आहे. आज सकाळपर्यंतच्या अंदाजात ऐशी हजार लोक निरनिराळ्या ठिकाणी अडकले आहेत. राज्यातील पाचशे रस्ते व दोनशे गावे वाहून गेल्याची शक्यता आहे. सध्या जरी दीडशे मृतदेह हाताला लागले असले तरी मृतांचा आकडा काही हजारात असल्याची शंका व्यक्त होते आहे.
उत्तराखंड स्थिति गन्भीर ; केंद्राकडून उत्तराखंडला एक हजार कोटींची मदत
पावसाच्या प्रकोपाचा सर्वाधिक फटका बसलेल्या उत्तराखंडची बुधवारी हवाई पाहणी केल्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी उत्तराखंडला तातडीची एक हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. या नैसर्गिक आपतीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना दोन लाखांची तर जखमींना पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि मी उत्तराखंडची जी दृश्ये पाहिली ती अत्यंत ह्दयद्रावक होती असे मनमोहन सिंग यांनी सांगितले. सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांनी बुधवारी उत्तराखंडची हवाई पाहणी करुन परिस्थितीचा आढावा घेतला. उत्तराखंडमध्ये आलेल्या पुरामध्ये अजूनही 62,000 प्रवासी अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस कोअर समितीची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील
बुधवारची स्थिती मंगळवारच्या तुलनेत सुधारत असल्याचे अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी सांगितले. अन्नमंत्री के.व्ही.थॉमस हे स्वत: हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड भागात अन्नपुरवठा होण्यासाठी लक्ष घालत आहेत. गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्सच्या मदतीने यात्रेकरुना बाहेर काढण्यात येत आहे. आतापर्यंत 42,000 यात्रेकरुंना बाहेर काढण्यात आले आहे. बद्रीनाथ येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय आपतकालीन निवारण कक्षाच्या 540 सैनिकांच्या 14 तुकड्या उत्तराखंडमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. सैन्यदलाच्या मदतीने 5000 यात्रेकरुंना बाहेर काढण्यात आले आहे.
