सलमानसाठी सोनाक्षी,अनुष्कात रेस

बॉलिवुडचा दबंग सलमान खान सोबत काम करण्यासाठी नेहमीच हिरोइन मध्ये रेस लागलेली असते. आता ही रेस अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अनुष्का शर्मा यांच्यामध्ये लागली आहे. राजश्री प्रॉडक्शनच्या आगामी काळात येत असलेल्या सिनेमात सलमान पूर्वीप्रमाणे लीड रोल करीत आहे. त्यामुळे या सिनेमात काम करण्यास मिळावे या साठी अनुष्का शर्मा आणि सोनाक्षी सिन्हा यांची नावे चर्चेत आहेत.

यापूर्वी सोनाक्षीने सलमान सोबत काम केले आहे. मात्र अनुष्काने आतापर्यंत काम केले नाही. बॉलिवुडच्या किंग खान सोबत अनुष्काने काम केले आहे. त्यमुळे आता तिला बॉलिवुडच्या दूसरे खान, सलमान खान सोबत काम करण्याची इच्छा झाली आहे. त्यमुळे आता तिने चांगला जोर लावला आहे.

त्यामुळे आता दोघीपैकी कोणाची निवड होते याकडे लक्ष लागले आहे. शूटिंग २०१४ मध्ये सुरु होणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगसाठी राजश्री प्रॉडक्शनने राजस्थान आणि गुजरातच्या लोकेशनची निवड केली आहे. हा सिनेमा २०१५ च्या दीवाळीत रिलीज होणार आहे. सलमानने राजश्री प्रॉडक्शन सोबत यापूर्वी ‘मैंने प्यार किया’, ‘हम आपके हैं कौन’ आणि ‘हम साथ-साथ हैं’ या सिनेमात लीड रोल केला आहे.