महिलानी घ्यावी विद्या कडून प्रेरणा- विवेक

बॉलीवुडमधील अभिनेत्री विद्या बालनची आतापर्यतची कारकीर्द यशस्वी ठरली आहे. विद्याचे जीवन म्हणजे तिचे करियर आहे. त्यामुळे आगामी काळात जर सर्व क्षेत्रात महिलांना यशस्वी व्हायचे असेल तर विद्या कडून प्रेरणा घ्यावी असे मत अभिनेता विवेक ओबरॉयने व्यक्त केले.

एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विवेक आला होता. यावेळी पत्रकारासोबत बोलताना विवेक म्हणला, ‘ विद्याची सिने करियर दिलचस्प राहिले आहे. २००५ साली तिने ‘परिणीता’ या सिनेमातून शानदार सुरुवात केली. त्यानंतर ‘हे बेबी’ आणि ‘किस्मत कनेक्शन’ सारख्या सिनेमात असफलता तिच्या हाती लागली. त्यावेळी विद्याचे करियर संपले असे काही जणांना वाटत होते. मात्र तिने अभिनयाच्या जोरावर २००९ साली ‘पा’ या सिनेमातून परत एन्ट्री केली. त्यामुळे तिला आतापर्यंत मागे फिरून पाहवे लागले नाही. तिने ‘इश्किया’ ‘नो वन किल्ड जेसिका’ ‘द डर्टी पिक्चर’ आणि ‘कहानी’ ने या सिनेमात विद्याने विश्वसनीय अभिनेत्री म्हणून नाव कमविले. ‘

अभिनेत्री विद्याने कधीच कोणाशी स्पर्धा केली नाही. त्यामुळे ख-या अर्थाने जर जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर महिलांनी विद्या कडून काही टिप्स घ्याव्यात असेही अभिनेता विवेक ओबरॉय म्हणाला .