उत्तर भारतात महापूर; ६० जणांचा मृत्यू

नवी दिल्ली – गेल्या दोन दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसाने उत्तर भारतातले जनजीवन कोलमडले आहे. उआत्तापर्यंत ६० जण या पुरामुळे मृत्यूमुखी पडलेत तर शेकडो जण पुराच्या पाण्यात अडकून पडलेत. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात पूराची परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर काशीला नाशिकमधून ७० भाविक, औरंगाबादमधून १७ जण तर लातूरचे सहा जण गेलेले आहेत. हे सर्व भाविक संकटात सापडले आहेत.

हरियाणमध्ये यमुनेच्या पाण्यात वाढ झाल्यानं इथं काही ठिकाणी पुराची परिस्थिती निर्माण झालीय. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीनं चिंतेत वाढ झालि आहे. गेल्या ४८ तासांपासून न थांबलेल्या पावसाने थैमान घातला आहे. राज्यातल्या सर्व नद्यांना महापूर आला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा फटका उत्तर काशीतल्या पर्यटकांनाही बसला असून . महाराष्ट्रातून काशीत गेलेले भाविकही या ठिकाणी अडकले आहेत. नाशिकमधून ७० भाविक, औरंगाबादमधून १७ जण तर लातूरचे सहा जण उत्तर काशीला गेलेले आहेत. हे सर्व भाविक संकटात सापडले आहेत. या पर्यटकांमध्ये बहुतांशी वृद्ध असल्याने, अनेक अडचणी येत आहेत.

ऋषिकेशमध्येही मुसळधार पाऊस सुरू असून गेल्या ४८ तासांपासून न थांबलेल्या पावसाने थैमान घातला आहे. राज्यातल्या सर्व नद्यांना महापूर आला आहे. या पुरामुळे ऋषिकेशमध्ये भलीमोठी शंकराची मूर्तीही नदीच्या पाण्यात वाहून गेली आहे.