सर्वांची मैत्री होऊ शकते पण बी-टाउन मधील दोन अभिनेत्रीची कधीच दोस्ती होत नाही. हा आतापर्यतचा समज होता. काही जनांनी तर याला आजपर्यंत हिट फंडाच मानला होता. मात्र हा फंडा बेबो म्हणजेच करीना कपूर व सोनम कपूरने मात्र साफ खोटा ठरविला आहे. गेल्या काही दिवसपासून दोघींची खास अशी गट्टी जमली आहे. त्यामुळे सर्व बॉलीवूड हैराण झाले आहे.
काही दिवसापूर्वीच सूत्राने दिलेल्या माहिती नुसार सोनम कपूर आणि करीना कपूर दोघीपण खूप जवळजवळ दिसत आहेत. दोघीपण शूट करून उरलेल्या वेळात सोबत फिरताना अनेकजणांना दिसल्या आहेत. दोघीपन जास्तीत जास्त वेळ एकमेकासोबत स्पेंड करीत आहेत. सप्ताहातून एक वेळेस तर दोघी जन नाईट आउट पार्टी मध्ये सहभागी झाल्याचे अनेकांनी पहिले आहे.
नुकत्याच झालेल्या एका फैशन शो मध्ये सोनम आणि बेबो एकमेकाची प्रशंसा करताना दिसत होत्या. या फैशन शो मध्ये बेबोची स्टाइल नंबर वन असल्याने सर्वानीच तिचे कौतुक केले. सध्या करीना व सोनमची दोस्ती फ़ूल फॉर्ममध्ये आहे. येत्या काळात अजून किती दिवस ही मैत्री टिकते हे पाहणे ओत्सुक्याचे ठरेल.