ठाणे- येथील खारेगाव टोलनाक्याजवळ ट्रक आणि कारच्या भीषण धडकेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. या अपघातात कारचा पूर्णपणे चुराडा झाला. काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी दोन मृतदेह बाहेर काढले.कारमधील सर्व प्रवासी हे अंबरनाथचे असल्याचे समजते. पोलीसानी अडकेलेले तीन मृतदेह बाहेर काढले आहेत.
पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार, खारेगाव टोल नाक्याजवळ पहाटे भरधाव वेगात आलेल्या कारने ट्रकला मागून धडक दिली. यात कारमधील पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात कारचा पूर्णपणे चुराडा झाला. काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी दोन मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर मदत कार्य करणा-या जवानांनी पत्रा कापून छिन्नविछिन्न झालेले अन्य तीन मृतदेह बाहेर काढले. अपघातात खूपच भीषण होता. त्यामध्ये दोन्ही गाड्याचा चकाचूर झाला आहे.
कारमधील सर्व प्रवासी हे अंबरनाथचे असल्याचे समजते. अद्याप अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे समजू शकली नाहीत. अपघातात खूपच भीषण होता. त्यामध्ये दोन्ही गाड्याचा चकाचूर झाला आहे.