पोलिसाने रोखली सैफची शुटींग

जयपुरपासून ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कुकास येथे यात्रेवेळी सैफ अली खान शूटिंग करण्यासाठी जात असताना पोलिसानी त्याला रोखले. यावेळी पोलिसांनी सुरु असलेली शुटींग सुद्धा रोखली.

गेल्या काही दिवसांपासून जयपूरमध्ये सैफ अली खान हा एका प्रॉडक्टच्या जाहीरातिचे शुटींग करीत आहे. शूटिंगसाठी हेलिकॉप्टर वापरण्याची परवानगी पोलिसाकडे मागितली होती. शूटिंग जवळच असलेल्या शिव विलास परिसरात करण्यात य्रणार होती. हेलिकॉप्टरची परवानगी या परिसरात हवी होती. मात्र या परिसरात खुप झाडे असल्याने हेलिकॉप्टरसाठी या ठिकाणी बंदी आहे.

याठिकाणी सैफ घोड्यावर स्वार होऊन शुटींग करीत असताना पोलिस त्या ठिकाणी पोहचले. झाडे असल्याने हेलिकॉप्टरमधून शुटींग करण्यास नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे सुरु असलेली शुटींग थांबवावी लागली. कारण की शूटीगला पोलिसानी परवानगी दिली नव्हती. मात्र यूनिटने प्रशासनाने परवानगी दिली असल्याचे सांगून शुटींग सुरु ठेवले होते. या सर्व प्रकारामुळे काही काळ शूट थांबवावे लागले. यामुळे सैफला नाहक त्रास सहन करावा लागला.