सोनमचा जवळचा मित्र धनुष

गेल्या काही दिवसापासून सर्वत्र नवोदित बॉलीवुड अभिनेता धनुष आणी अभिनेत्री सोनम कपूर यांच्या मैत्रीची चर्चा जोरात सुरु आहे. हे चर्चा सुरु असतानाच फिल्म इंडस्ट्रीमध्ये सोनम कपूरचा सर्वात जवळचा मित्र मीच असल्याचे धनुषने सांगून टाकले आहे. त्यामुळे आता सोनम-धनुष चांगले मित्र असल्याची खात्री सर्वाना पटली आहे.

याबाबत बोलताना धनुष म्हणाला, फिल्म इंडस्ट्री मध्ये गेल्या काही दिवसपासून काम करीत असताना माझी सोनमसही चांगली मैत्री झाली आहे. सोनमने माझी हिंदी भाषा सुधारन्यासाठी खुप काही मदत केली आहे. सोनम एक चांगली मुलगी आहे तिच्यासोबत माझे ट्युनिंग चांगले जमते.’

आगामी काळात ‘रांझना’ या सिनेमातून कोलावरी डी फेम धनुष बॉलीवुडमध्ये एन्ट्री करीत आहे. धनुष दक्षिण भारतीय सिनामाचा महानायक रजनीकांतचा जावाई आहे. रांझना या आगामी कळत येत असलेल्या सिनेमात धनुष आणि सोनमशिवाय अभय देयोलची मुख्य भूमिका आहे. दिग्दर्शक आनंद राय यांचा “रांझना” हा सिनेमा २१ जून रोजी प्रर्दशित होत आहे.