वॉशिग्टन दि. १० – फिनलंडच्या झेनरोबोटिक्स कंपनीने बांधकामाच्या राड्यातील वेस्ट वेचून रिसायकलिगसाठी निवडणारे रोबो विकसित केले असून त्यामुळे जगाच्या कचरा विल्हेवाटीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल अशी आशा व्यक्त केली आहे.

कंपनीने असा रोबो तयार केला आहे जो कन्व्हेअर बेल्टवरून येणार्या बांधकामाच्या मलब्यातून रिसायकलिंग होणारे मटेरियल वेगळे काढू शकणार आहे. सध्या हे काम माणसांकडूनच केले जाते मात्र हे काम अत्यंत धोकादायक असते तसेच खर्चिकही असते. नव्या रोबोमुळे हे काम तप्तरतेने, सुरक्षितपणे आणि कमी खर्चात होऊ शकणार आहे.
जगभरात निर्माण होत असलेल्या वेस्ट मटेरियल मध्ये १/३ कचरा हा बांधकामाचा असतो. अमेरिकेत दरवर्षी असा ३२५ दशलक्ष टन कचरा तयार होत असतो तर युकेमध्ये दरवर्षी असा १२० दशलक्ष टन कचरा निर्माण होतो. रोबोमुळे हा कचरा वेगाने सेपरेट करण्यात मदत होणार आहे. यासाठी कंपनीने सेन्सर फ्यजन तंत्रज्ञानाचा वापर केला असून हा रोबो कचर्याचे वजन, थ्रीडी स्कॅनिगही करू शकतो असे रोबो तयार करणारे पेल्टोमा यांनी सांगितले.