आणंद दि.७ – गुजराथ को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या अमूल ब्रॅडची कांही उत्पादने येत्या सहा ते आठ महिन्यात अमेरिकेतील न्यू जर्सी जवळील प्रकल्पात उत्पादित केली जाणार असल्याचे अमूल को.ऑप. मिल्क प्रोड्यूसर युनियनने जाहीर केले आहे. न्यू जर्सी मधील एका प्रकल्प मालकाशी तसा थर्ड पार्टी करार अमूलने केला असल्याचे युनियनचे व्यवस्थापकीय संचालक आर. एन. सोधी यांनी सांगितले.
या संबंधी अधिक माहिती देताना अमूलमधील वरीष्ठ अधिकारी म्हणाले की सध्या अमूलच्या डेअरी उत्पादनांचीअमेरिकेत वर्षाला ३५ कोटी रूपयांची निर्यात होत आहे. नव्या करारामुळे आमचा महत्त्वाच्या बाजारपेठेत शिरकाव होत आहे व त्यामुळे आमच्या उत्पादनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ होणे अपेक्षित आहे. सध्या पनीर आणि तूप या पदार्थांचे उत्पादन जर्सीतील प्रकल्पात केले जाणार आहे आणि कालांतराने आमचे सर्व डेअरी प्रॉडक्ट तेथे तयार होऊ लागतील.
यामुळे अमूलला उत्पादने निर्यात करण्यासाठी सरकारला ज्या ड्यूटी आणि टॅकसेस द्यावे लागतात ते वाचणार आहेत. गुजराथ फेडरेशन ने २०११-१२ या वर्षात १३७५० कोटी रूपयांची अमूल उत्पादने निर्यात केली असून ही वाढ गतवेळच्या निर्यातीपेक्षा १८ टक्के अधिक आहे.