धोनी हायेस्ट पेड अॅथलेट

नवी दिल्ली दि.७ – जगातील हायेस्ट पेट अॅथलेटच्या यादीत भारताच्या क्रिकेट टीमचा कप्तान महेंद्रसिंग धोनी याने १६ वे स्थान पटकावले आहे. फोर्बसने जाहीर केलेल्या या यादीत प्रथम स्थानावर गोल्फर टायगर वूड आहे.. धोनी भारतीय अॅथलेटमध्ये उत्पन्नाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे आणि त्याचे उत्पन्न आहे ३१.५ दशलक्ष डॉलर्स म्हणजे अंदाजे १८० कोटी रूपये. या यादीत अन्य भारतीयांत फक्त सचिन तेंडुलकरचा समावेश असून त्याचे या यादीतील स्थान ३१ वे आहे आणि त्याचे उत्पन्न आहे २२ दशलक्ष डॉलर्स म्हणजे १२५ कोटी रूपये.

गेल्या वर्षी धोनी या यादीत ३१ व्या क्रमांकावर होता. यंदाच्या यादीत त्याने फेरारीचा फर्नांडो ओलन्सो (यादीतील स्थान १९), आयर्लंडचा गोल्फर रोरी मॅक्लरी (२१), लुईस हॅमिल्टन (२६), नोवोक जोकोव्हिक (२८) राफेल नदाल (३०) आणि उसेन बोल्ट (४०) यांना मागे टाकले आहे. या यादीत तीन महिला खेळाडूही आहेत आणि त्या सर्व टेनिस पटू आहेत. मारिया शारापोव्हा २२ व्या स्थानावर असून तिचे उत्पन्न आहे २९ दशलक्ष डॉलर्स त्यानंतर सेरेना विल्यम्स आणि चीनची स्टार ली ना यांनाही या यादीत स्थान मिळाले आहे.

Leave a Comment