साहित्यखरेदीमध्ये लॅपटॉप व वेब कॅमेरा नको – विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचना

पुणे, दि. 4 (प्रतिनिधी) – वरिष्ठ महाविद्यालयांना विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) आता साहित्यखरेदीमध्ये लॅपटॉप आणि वेब कॅमेरे घेण्यास परवानगी नाकारली आहेे. त्यासंबंधीची माहिती पुणे विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना दिली आहे.

पुणे विद्यापीठाच्या नियोजन व विकास विभागाचे उपकुलसचिव एस. जे. बोकेनी ही माहिती दिली. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून महाविद्यालयांना साहित्यखरेदीसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यात येते. या अनुदानातून महाविद्यालयाने साहित्यखरेदी करणे अपेक्षित आहे. परंतु हल्ली सर्वच महाविद्यालयांनी लॅपटॉप आणि वेब कॅमेरे खरेदी केल्याचे युजीसीच्या निदर्शनास आले आहेत. त्यामुळे युजीसीची मान्यताप्राप्त महाविद्यालयांना यापुढे लॅपटॉप आणि वेब कॅमेरेसाठी कोणत्याही प्रकारचे अनुदान दिली जाणार नसल्याचे परिपत्रक जारी केले आहे. आता साहित्यखरेदीमधून लॅपटॉप व वेव कॅमेरे वगळण्यात आले आहे. युजीसीच्या नियमावलीनुसार किमान 10 वर्षे सुरू असलेल्या महाविद्यालयांना ही अट लागू राहणार आहे.

यासंदर्भात बोकेफ ोडे म्हणाले, युजीसीचे पत्र मिळाले आहे. त्यानुसार परिपत्रक सर्व महाविद्यालयांना पाठविण्यात आले आहे. त्यानुसार महाविद्यालयांना लॅपटॉप व वेब कॅमेेरे खरेदीसाठी अनुदान मिळणार मिळणार नाही.