रोतडू, कावळा सट्टेबाजांचे कोड वर्ड

मुंबई, दि.30 – आयपीएल सट्टेबाजीप्रकरणात सट्टेबाजांचे कोड वर्ड उघड झाली आहे. विंदू दारासिंहकडून जप्त करण्यात आलेल्या डायरीतून, सट्टेबाज वापरत असलेली सांकेतिक भाषा समोर आली आहे.

यामध्ये श्रीशांतला रोतडू, अंकित चव्हाणला कावळा, सचिन तेंडुलकर बटकू, गेल रावण तर धोनीला हेलिकॉप्टर म्हणून संबोधलं जात असे. अंडरवर्ल्डमध्ये सट्टा लावण्याला ‘कराची’, तर एक कोटीला ‘मिरची’ हा शब्द वापरत असल्याचं उघडं झालंय. सट्टेबाज खेळाडूंचा उल्लेख करताना त्यांची थेट नावं घ्यायचं टाळत होते. त्यामुळे फिक्सिंगप्रकरणात आता नवनवीन गौप्यस्फोट होत आहेत. सट्टेबाज फोवृनवरुन संभाषण करताना खेळाडूंच्या नावाच्या सांकेतिक भाषेचा वापर करायचे हे आता उघडं होतंय.

यावेळी सट्टेबाजांनी खेळाडूुचे वापरलेले ‘कोड वर्ड्स’ पुढीलप्रमाणे- सचिन तेंडुलकर- बटकू, धोनी- हेलिकॉप्टर, गेल- रावण, मलिंगा- मंकी, युवराज सिंह- मॉडल, सेहवाग- चष्मा, हरभजन सिंग- पगडी, सुरेश रैना- शेरएस, श्रीशांत- रोतडू, अजित चंडिला- मोगली, अंकित चव्हाण- कावळा, विराट कोहली- शायनिंग, आर. अश्विन- फिरकी, विंदू दारा सिंह- जॅक, गुरुनाथ मय्यपन- गुरूजी, असद रौफ- दादा असे आहेत.