
‘लाइफ पार्टनर’, ‘गली गली चौर है’, ‘गॉड तुसी ग्रेट हो’ अशा चित्रपटांचा दिग्दर्शक आणि ‘कुली नंबर वन’, ‘जोडी नंबर वन’ यांसारख्या ९० च्या दशकातील असंख्य चित्रपटांचा कथा- पटकथा-संवाद लेखक रूमी जाफरी याच्याकडे आता ‘शौकीन’ या चित्रपटाच्या रिमेकची धुरा सोपविण्यात येणार आहे. बासू चटर्जी दिग्दर्शित १९८२ साली झळकलेल्या ‘शौकीन’मध्ये अशोक कुमार, ए. के. हंगल, उत्पल दत्त यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सुरुवातीला अभिनेता रोहित रॉय या चित्रपटाच्या रिमेकद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करणार होता. परंतु चित्रपटाच्या हक्कांवरून वाद निर्माण झाला. आता चित्रपटाचे हक्क सिनेकॉर्न बॅनरकडे असून मूळ चित्रपटाच्या पटकथेवर
काम करून नंतर चित्रपटाचे दिग्दर्शनही रूमी जाफरीकडे सोपविण्यात आले आहे.
