
सोनी एन्टरटेनमेन्ट टेलिव्हिजन आपल्या दर्शकांसाठी घेऊन येत आहे, ऐतिहासिक नाट्याने भरलेली मालिका भारत का वीर पुत्र-महाराणा प्रताप. भारतातील पहिला स्वातंत्र्य योद्धा असलेल्या या वीराच्या कथेची निर्मिती काँटिलो टेलिफिल्म्सने केली आहे. ही कथा 400 वर्षापूर्वी होऊन गेलेल्या क्रांतीकारी राजपूत योद्धाची आहे. ही मालिका 27 मे पासून दर सोमवार ते गुरुवारी रात्री 10 वाजता सोनी एन्टरटेनमेन्टवर प्रसारीत होणार आहे. महाराणा प्रताप म्हणजे सळसळते रजपूत रक्त, शौर्य व अवघड परिस्थितीतून तग धरण्याची बाणेदार वृत्ती.मुघलांच्या आक्रमणाविरुद्ध स्वातंत्र्याकरिता लढत देणारा हा एकांडा शिलेदार होता जो कोणत्याही मोहासमोर कधीही वाकला नाही. त्याच्यावर त्याच्या सहकार्यांचे प्रेम होते व स्वातंत्र्यलढ्यात ते कायम त्याच्या बाजूने राहिले.
