वॉशिग्टन दि.२४ – दहशतवाद्यांच्या विरोधात लढताना केला गेलेला ड्रोनचा वापर हा योग्यच होता कारण तो स्वसंरक्षणासाठी केला गेला होता असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले. भविष्यातील दहशतवाद्यांच्या विरोधातील डावपेच काय असतील या संबंधी ते राष्ट्रीय संरक्षण विश्वविद्यालयाच्या एका कार्यक्रमात बोलत होते.
ओबामा म्हणाले की ड्रोनचा वापर केला गेल्यामुळे अनेक धोकादायक दहशतवादी मारले गेले व त्यामुळे अनेक निरपराध नागरिकांचे प्राणही वाचले हे लक्षात घेतले पाहिजे. अधिकाधिक अमेरिकन मारण्याची प्रतीज्ञा या दहशतवाद्यांनी केली आहे आणि अशावेळी हातावर हात धरून बसून राहणे हा त्यावरचा मार्ग असू शकत नाही. हे कुठेतरी थांबलेच पाहिजे. दहशवाद्यांच्या विरोधातीही ही केवळ कारवाई नाही तर ते युद्धच आहे आणि त्यात स्वसंरक्षणला सर्वाधिक प्राधान्य आहे.