दीपिकाच्या मुलांचा गॉडफादर बनायला आवडेल- रणबीर

पूर्वाश्रमीची प्रेयसी आणि जवानी है दिवानी या चित्रपटाची नायिका दीपिका पदुकोण हिच्या मुलांचा गॉडफादर बनायला आपल्याला आवडेल असे बॉलिवूड अभिनेता रणीबर कपूर याने म्हटले आहे. गॉडफादर बनून दीपिकाच्या मुलांना सल्ले देणे आपल्याला आवडेल असे त्याचे म्हणणे आहे. सध्या रणबीर आणि दीपिका त्यांच्या नव्या जवानी है दिवानी या चित्रपटाच्या प्रचारासाठी देशात फिरत आहेत.

रणबीर अशाच एका प्रचार दौर्यारवेळी बोलत होता. तो म्हणाला की गॉडफादर ही अशी व्यक्ती असते जी तुम्हाला आवडते. आपल्या मुलांनी त्यांचा सल्ला घ्यावा अशी ही भावना त्यामागे असते. म्हणून दीपिकाच्या मुलांचा गॉडफादर बनायचे आहे. हे दोघेही त्यांचा भूतकाळ विसरले आहेत असे त्यांच्या वर्तनावरून दिसून येत आहे. कारण दोघेही मनमोकळेपणाने एकमेकांच्या सहवासाचा आनंद लुटत आहेत. जवानी है दिवानी हा त्यांचा एकत्र भूमिका असलेला सिनेमा तब्बल पाच वर्षांच्या गॅपनंतर प्रदर्शित होत आहे.

Leave a Comment