चेन्नई, दि.२४- चेन्नई सुपर किंग्जचे मालक आणि बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे जावई गुरूनाथ मयप्पन यांचे आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी नाव आल्यामुळे त्यांच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांची टीम गुरूवारी चेन्नईला गेली होती. मात्र ते घरी न भेटल्यामुळे पोलिसांनी त्यांना समन्स बजावले आहे.
चौकशीसाठी मयप्पनना समन्स
अभिनेता विदू रंधवा याला स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीत मयप्पन यांचे नाव पुढे आले. तसेच ते विंदूच्या सतत संपर्कात असल्याचे चौकशीत आढळून आले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विंदूने चेन्नईमध्ये अनेक कॉल्स केले होते, त्यातील बरेचसे कॉल्स त्याने मयप्पन यांना केले होते, असे पोलिसांनी केलेल्या चौकशीत आढळून आले होते. त्यामुळे मयप्पन यांच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांची दोन जणांची टीम चेन्नईला गेली होती
