
प्रेक्षक पुन्हा एकदा आमिर खान आणि सलमान खानच्या जोडीला पडद्यावर पाहू शकतील. निर्माता विनय कुमार सिन्हा ‘अंदाज अपना अपना’चा सिक्वेल बनवू इच्छित आहेत. सगळे काही सुरळीत राहिले तर या सिनेमाचे चित्रीकरण याच वर्षी डिसेंबरमध्ये सुरू होऊ शकते. 19 वर्षांपूर्वी विनयने ‘अंदाज अपना अपना’ सिनेमाची निर्मिती केली होती. राजकुमार संतोषी दिग्दर्शित हा विनोदी चित्रपट होता. बॉक्स ऑफिसवर तो सरासरी यश मिळवू शकला. आता विनय याचा सिक्वेल बनवू इच्छित आहेत. सिक्वेलचे दिग्दर्शन राजकुमार संतोषीनेच करावे, अशी विनयची इच्छा होती.
