वाजपेयी, आडवाणी यांना भेटले मोदी

नवी दिल्ली, दि.२२ – गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाच्या राजधानीत दाखल झाल्यानंतर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याबरोबरच ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांना ते भेटले. मात्र, या भेटींमधील चर्चेचा तपशील समजू शकला नाही.

पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदींचे नाव पुढे केले जावे, अशी मागणी भाजपच्या काही नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडूनही केली जात आहे. पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून नाव निश्चिित होण्यासाठी भाजपच्या प्रमुख नेत्यांचा पाठिंबा आवश्यक ठरणार आहे. या पार्श्ववभूमीवर, मोदी यांनी आज घेतलेल्या भेटींचे महत्त्व वाढले आहे. भाजपच्या संसदीय मंडळ बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मोदी दिल्लीवारीवर आले होते.