नवी दिल्ली, दि. २२ – आज निवृत्त होत असलेल्या विनोद राय यांच्या जागी भारताचे नवे नियंत्रक आणि महालेखापाल (कॅग) म्हणून संरक्षण सचिव शशिकांत शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शशिकांत शर्मा नवे कॅग
बिहार केडरच्या १९७६ मधील तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी असणारया शर्मा यांच्या कॅग पदावरील नियुक्तीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शिक्कामोर्तब केले. शर्मा २३ मे यादिवशी कॅग म्हणून कार्यभार स्वीकारतील. त्यादिवशी राष्ट्रपती त्यांना पदाची शपथ देणार आहेत. शर्मा यांनी यापूर्वी वित्तसेवा विभागातील सचिवपदाची जबाबदारीही सांभाळली होती. मावळते कॅग राय यांची साडेपाच वर्षांची कारकीर्द चांगलीच गाजली. या कारकिर्दीत त्यांनी 2 जी स्पेक्ट्रम आणि कोळसा खाणवाटप प्रकरणांवरून दिलेल्या अहवालांवरून मोठीच राजकीय वादळे निर्माण झाली.
