बॉलीवुडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि सैफ अली खानची पत्नी करीना कपूर-खानने सध्या अभिनयाच्या बाबतीत खूपच प्रगती केली आहे. सध्या त्यामुळेच ती यशाच्या शिखरावर आहे. २००० साली प्रदर्शित झालेल्या ‘रिफ्यूजी’ या सिनेमातून तिने सिने करियरची सुरुवात केलीं. करीना बॉलीवुडमधील प्रसिद्ध फामिली असलेल्या कपूर परिवाराशी संबधित आहे.
कपूर परिवराचा भारतीय सिनेमाशी ८५ वर्षोंपासूनचे जुने नाते आहे. यावेळी प्रसारमाध्यमाशी बोलताना अभिनेत्री करीना कपूर म्हणाली, ‘ माझी बहिण करिश्मा कपूर परिवारातील पहिली मुलगी होती. जिने की बॉलीवुडमध्ये काम केले. करिश्माने तयार केलेल्या बॉलीवुडमधील रास्त्यामुळे मला एन्ट्री करताना अडचण आली नाही. संपूर्ण कपूर परिवाराच या क्षेत्रात असल्याने अभिनय माझ्या रक्तातच आहे.’
करीना कपूरचे पंजोबा पृथ्वीराज कपूर यांनी १९२८ साली प्रदर्शित झालेल्या ‘खानदान’ या सिनेमातून करियरची सुरुवात केली. त्यानंतर पृथ्वीराज कपूरचे तीन मुले राज कपूर, शम्मी कपूर आणि शशि कपूरने पण सिनेइंडस्ट्रीला उल्लेखनीय योगदान दिले. त्यानंतर राज कपूरची दोन मुले ऋषि कपूर आणि रणधीर कपूर पण सिने इंडस्ट्रीमध्ये सक्रिय होते. तर रणधीर कपूरच्या दोन मुली म्हणजेच करिश्मा आणि करीनाने बॉलीवुडमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे.