रणबीर, इमरान झाले दोस्त

गेल्या काही दिवसापासून अभिनेता रणबीर कपूर व इमरान खान यांच्यातील संबध काही करणामुळे ताणले गेले होते. मात्र हे सर्व काही मतभेद विसरुन दोघेपण एका सोशल इशूसाठी एकत्रित येणार आहेत. आगामी काळात रणबीर आणि इमरान एका सोशल इशूसाठी अपील करणार असल्याचे समजते.

या दोघाना एकत्रित आणण्याचे काम अनेक फिल्ममेकर्सना करता आले नाही. ते काम प्रड्यूसर रितेश सिद्धवानीने करून दाखविले आहे. त्यानेच मध्यस्थी करून इमरान खान आणि रणबीर कपूर या दोघांना काम करण्यासाठी राजी केले आहे. यापूर्वी यासाठी कित्येक प्रड्यूसर आणि डायरेक्टरने प्रयत्न केले होते. रणबीर आणि इमरानचा प्रफेशनल लेवलवर कॉम्पिटिशन आहे. हे सर्वाना माहिती आहे. त्यामुळेच आतापर्यंत दोघेपण काम करण्यासाठी राजी होत नव्हते.

रितेशने दिलेली कल्पना त्यांना ऐकावी लागली. मिनिस्ट्री ऑफ एजुकेशनच्या फ्री एजुकेशनला प्रमोट करण्याचे काम आता त्यांना करावे लागणार आहे. येत्या काळात जर ऐक्टर्स ही जबाबदारी संभाळून एफर्ट करणार असतील तर एजुकेशनसाठी सुद्धा चांगली गोष्ट आहे.
या प्रॉजेक्टमध्ये रणबीरची स्पेशल फ्रेंड कटरीना कैफ शिवाय अनुष्का शर्मा सुद्धा सहभागी होणार असल्याचे समजते.

Leave a Comment