बंगळूर, -कर्नाटकमधील नवनिर्वाचित आमदारांपैकी तब्बल 203 जणकरोडपती असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य विधानसभेतील आमदारांची सरासरी मालमत्ता 23.54 कोटी रूपये इतकी आहे. कर्नाटक इलेक्शन वॉच (केईडब्लू) या स्वयंसेवी संघटनेने नव्याने निवडून आलेल्या 223 आमदारांपैकी 218 आमदारांच्या प्रतिज्ञापत्रांचे पृथक्करण केले. त्यातून कर्नाटकातील दोनशेपेक्षा अधिक नवनिर्वाचित आमदार करोडपती असल्याचे स्पष्ट झाले. मागील निवडणुकीवेळी (2008) राज्यातील आमदारांची सरासरी मालमत्ता 10.02 कोटी रूपये इतकी होती. त्यात यावेळी 135 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसते. यावेळी 93 टक्के आमदार करोडपती आहेत. मागील वेळी हे प्रमाण 63 टक्के इतके होते.
कर्नाटकमधील नवनिर्वाचित २०३ आमदार करोडपती
यावेळी कर्नाटक विधानसभेवर पुन्हा निवडून गेलेल्या 92 आमदारांच्याप्रतिज्ञापत्रांचाही अभ्यास करण्यात आला. त्यावरून त्यांच्या सरासरी मालमत्तेत 72 टक्क्यांनी वाढ झाल्याचे आढळते. मागील वेळी 17.53 कोटी रूपये सरासरी मालमत्ता असणार्या या आमदारांच्या मालमत्तेची सरासरी आता
30.15 कोटी रूपये इतकी आहे. मागील पाच वर्षांत काँग्रेसचे आमदार डी.के.शिवकुमार यांच्या मालमत्तेत सर्वाधिक 175 कोटी रूपयांची वाढ झाली आहे. त्यांच्याकडे 2008 मध्ये सुमारे 75 कोटींची मालमत्ता होती. त्यांनी 2013 मध्ये स्वत:ची मालमत्ता 251 कोटी रूपये किमतीची दाखवली आहे. नवनिर्वाचित 74 आमदारांवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
