
नवी दिल्ली, – पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. या भेटीत संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबतचर्चा झाल्याचे समजते. हे अधिवेशन कालच अनिश्चितकाळासाठी तहकूब करण्यात आले.

नवी दिल्ली, – पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. या भेटीत संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबतचर्चा झाल्याचे समजते. हे अधिवेशन कालच अनिश्चितकाळासाठी तहकूब करण्यात आले.
पंतप्रधानांनी घेतलेली राष्ट्रपतींची भेट नियमित स्वरूपाची असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. अभिभाषणाचे निमंत्रण देण्यासाठी पंतप्रधानांनी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राष्ट्रपतींची भेट घेतली होती. आता अधिवेशन संपल्यानंतर राष्ट्रपतींचे आभार मानण्यासाठी पंतप्रधान त्यांना भेटले, असे सूत्रांनी स्पष्ट केले. अधिवेशनाच्या कामकाजाबाबत यावेळी दोघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. निर्धारित कार्यक्रमाच्या दोन दिवस आधीच अधिवेशन काल अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. पंतप्रधानांबरोबरच कायदामंत्री अश्वनीकुमार आणि रेल्वेमंत्री पवनकुमार न्सल यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्यातून झालेल्या जोरदार गदारोळामुळे अधिवेशनाचे कामकाज ठप्प झाले.
या पार्श्वभूमीवर, अधिवेशनाचे कामकाज निर्धारित वेळेच्या दोन दिवस आधीच अनिश्चित काळासाठी तहकूब करण्याचे पाऊल उचलण्यात आले.
अधिवेशनाच्या दुसर्या सत्रात संसदेच्या दोन्ही सभागृहांत गदारोळाचेच चित्र दिसत होते. त्यामुळे बहुतांश कामकाज वाया गेले. या सत्रात लोकसभेच्या 94 तास 42 मिनिटे इतक्या कालावधीसाठी बैठका झाल्या. मात्र,त्यातील तब्बल 92 तास 40 मिनिटांचे कामकाज वाया गेले. तर राज्यसभेत समारे 82 तासांचे कामकाज वाया गेले.