‘घनचक्कर’ मधून संजय बाहेर

आगामी काळात येत असलेल्या दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांच्या ‘घनचक्कर’ या सिनेमातून अभिनेता संजय दत्त बाहेर पडला आहे. या सिनेमातील एका सीनसाठी दिग्दर्शक राजकुमार गुप्ताने संजयची निवड केली होती. मात्र हा निर्णय बदलत राजकुमार गुप्ताने संजयशिवाय शूट करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत बोलताना अभिनेता राजकुमार म्हणाला, ‘ घनचक्कर या सिनेमातून संजयला हटवण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पहिले तर या सीनसाठी सजयची गरज होती. मात्र या सिनेमाची शूट करण्यासाठी त्याच्याकडे वेळ नसल्याने अशास्वरूपाचा निर्णय घेतला असल्याचे त्याने स्पष्ट केले. ‘

सध्या संजय दोन शिफ्टमध्ये काम करून लवकरच काम आटोपण्याची तयारी करीत आहे. राजकुमार गुप्ता म्हणाला, ‘ संजय दत्त साठी हा सीन महत्वाचा नाही. त्यशिवाय हा सीन पूर्ण होऊ शकतो.’ आगामी काळात येत असलेल्या या सिनेमात अभिनेत्री विद्या बालन आणि इमरान हाशमी यांची मुख्य भूमिका आहे. ‘घनचक्कर’ हा सिनेमा २८ जून रोजी रिलीज होणार आहे.