नवी दिल्ली – जायकवाडी धरणासाठी पाणी सोडता येणार नाही, असेशपथपत्र महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सादर केले
आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त मराठवाड्याला आता पाणी मिळेल की नाही, असाप्रश्न निर्माण झाला आहे.
नगर आणि मनमाडच्या नागरिकांनी जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्यानिर्णयासंदर्भात याचिका दाखल केली होती. यावर राज्य सरकारने सर्वोच्च
न्यायालयात मंगळवारी शपथपत्र सादर केले.
जायकवाडी धरणासाठी पाणी सोडता येणार नाही
यामध्ये जायकवाडीसाठी सोडण्यातयेणारे पाणी वाया जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. ज्या धरणांमधूनपाणी सोडण्यात येणार आहे त्या परिसरातही पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे
जायकवाडी धरणासाठी पाणी सोडता येणार नाही, असे सरकारने म्हटले आहे. तसेचजायकवाडीत पाणी न सोडण्याच्या भूमिकेवर सरकार ठाम आहे.
दरम्यान, भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी यासंदर्भात राज्य सरकारवर कठोरशब्दांत टीका केली आहे. राज्य सरकारने नेहमीच मराठवाड्याला सापत्नभावाची
वागणूक दिल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच मराठवाड्यासाठी पाणीसोडावे, अशी आग्रही मागणी मुंडे यांनी केली आहे.
