मेस्माचा इशारा मिळताच 400 प्राध्यापक रूजू

पुणे, दि. 7 (प्रतिनिधी) – राज्यातील अध्यापकांना देय असलेल्या वेतन आयोगाच्या थकबाकीपोटी सरकारने पाचशे कोटी रुपये दिले आहेत. प्रत्येक महाविद्यालयाला प्रध्यापक संख्येनुसार रक्कम वर्ग करण्यात आली आहे. मात्र, जे आंदोलनात सहभागी आहेत, त्यांची थकबाकीची रक्कम रोखण्यात आली आहे. दरम्यान, पुणे विभागातील सुमारे 400 प्राध्यापकांनी मंगळवारी परिक्षेवर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयातुन माघार घेतली.

जे प्राध्यापक आंदोलनात सहभागी नाहीत, त्यांना दोन दिवसांत थकबाकीची रक्कम मिळेल. राज्यात अजूनही नऊ हजारांहून अधिक अध्यापक आंदोलनात आहेत, त्यांचीही रक्कम महाविद्यालयांकडे वर्ग केली आहे; परंतु ते आंदोलनात असल्याने त्यांना ही रक्कम दिली जाणार नाही. राज्य सरकारने थकबाकीची रक्कम देण्याची तयारी दर्शविली असून, थकबाकीची उर्वरित 709 कोटी रुपयांची रक्कमही देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे.

दरम्यान, पुणे विभागातील सुमारास400 प्राध्यापकांनी मंगळवारी परिक्षेवर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयातुन माघार घेतल्याने संपकरी प्राध्यापकात मुट पडत अस्ल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या दोन दिवसात संप मागे अन्यथा मेस्मा अंतर्गत कारवाई करन्याचे संकेत मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांनी दिल्या नंतर ही मुट पडली आहे. पुणे जिल्ह्यात 4 हजार 549 प्राध्यापक आहेत त्यापैकी 2 हजार 712 प्राध्यापकांनी संपात सहभागी आहेत तर 1 हजार 828 संपात सहभागी नाहीत. मंगळवारी 400 प्राध्यापकांनी संपातुन माघार घेत असल्याचे विभागीय कार्यालयास कळविले आहे.
या संदर्भात बोलताना पु्नटोचे अध्यक्ष एस.पी. लवांडे म्हणाले, आम्ही प्राध्यापकांच्या मागण्यावर ठाम आहोत. मुख्यमंत्र्यांनी मेस्मा नुसार कारवाईचे संकेत दिले अस्ले तरी त्या कारवाईची आम्ही वाट पहाणार आहोत. कोणत्याही कारवाईला