पुणे, दि. 7 (प्रतिनिधी) – 12 वी नंतर अभियांत्रीकी वास्तुविशारद अभ्यसक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या संयुक्त प्रवेश परिक्षेचा (जेईई मेन) निकाल मंगळवारी जाहिर करण्यात आला. या परिक्षेत पुण्यातील सुमारे 400 विद्यार्थ्यांची जेईई अॅडव्हान्स परिक्षेसाठी निवड झाली आहे.
जेईई मेन परिक्षा 7 एप्रिल रोजी घेण्यात आली होती. य परिक्षेसाठी देशभरातुन 14 लाख विद्यार्थी बसले होते. त्यातील दिड लाख विद्यार्थी जुन महिन्यात होणार्या अॅडव्हान्स परिक्षेस पात्र ठरले आहेत. पुण्यातील 24 हजार विद्यार्थ्यांनी जेईई मेन परिक्षा दिली होती त्यापैकी 400 विद्यार्थ्यांची निवड जेईई अॅडव्हान्स परिक्षेसाठी झाली आहे.
जेईई मेन परिक्षा 360 गुणांची होती. अॅडव्हान्स साठी खुला वर्ग 113 गुण, ओबीसी 70 गुण, एससी 50 तर एसटी साठी 45 गुणांचा कट ऑम ठेवण्यात आला आहे. जेईई मेन परिक्षेत 60 पेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुण्याच्या विनाअनुदानित महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो. देशातील 16 आयाअयटी मध्ये जेईई अॅडव्हान्स परिक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळो शकतो. 16 आयाअयटीमध्ये 9 हजार 600 जागा उपलब्ध आहेत. जेईई अॅडव्हान्स परिक्षा 2 जुन रोजी होणार असून तिचा निकाल 23 जून रोजी आयाअयटीची संकेतस्थळावर जाहिर करण्यात येणार आहे.