पुणे दि ६ : ऑप्टीकल फायबर , वायर निर्मितीक्षेत्रात ३ . ८ १ अब्ज युरो उलाढाल असलेल्या जागतिक दर्जाच्या लिओनी समुहाने पुण्याजवळ चाकणमध्ये दुसरा उत्पादन प्रकल्प उभारला असून त्यासाठी ७ ० कोटी रुपये गुंतवणूक करण्याचे ठरविले आहे.
लिओनी समुहाचा ऑप्टीकल फायबर , वायर प्रकल्प पुण्यात
जर्मन शेअर बाजारावर ही कंपनी नोंदलेलि असून ३ २ देशात कारखाने आहेत. भारतातील वाहन उद्योगाला लागणाऱ्या केबलचे उत्पादन कंपनी करणार आहे. तेल आणि वायू, पेट्रो रसायने, उर्जा या क्षेत्राला लागणारी केबल या प्रकल्पात तयार केली जाणार आहे तसेच आशियातील इतर देशांना निर्यात केली जाईल अशी माहिती अध्यक्ष क्लॉस प्रोब्स्ट यांनी आज येथे दिली .
भविष्यातील योजनांबाबत ते म्हणाले की सौर आणि रेल्वे या क्षेत्राला विशिष्ट प्रकारच्या केबल लागतात त्याच्या उत्पादनासाठी इलेकट्रोन बीम यंत्रणा २ ० १ ५ पर्यंत भारतात सुरु केली जाणार आहे. पुण्याजवळ स्थानिक आणि जागतिक दोन्ही प्रकारचे ग्राहक असल्याने व्यवसाय वाढीस मोठा वाव आहे. याखेरीज रेल्वे इंजिन, ट्राम , मेट्रो , मालवाहतूक यंत्रणेला लागणारी केबल याचीही निर्मिती केली जाणार आहे. स्थानिक पातळीवर स्वस्त कच्चा माल , चांगली वाहतूक सुविधा असल्याने आमचा उत्पादन खर्च कमी असेल आणि त्याचा फायदा आम्हाला मिळेल असेही त्यांनी नमूद केले . नव्या प्रकल्पाने १ ४ ० जणांना रोजगार मिळाला आहे
