गेल्या काही दिवसांपासून खिलाड़ी अक्षय कुमार आणि किंग खान शाहरुखमध्ये सध्या शीत युद्धची स्थिती आहे. शाहरुख खानचा ‘चेन्नई एक्सप्रेस’ हा सिनेमा ज्या दिवशी रिलीज होणार आहे. त्याच दिवशी अक्षय कुमारचा ‘वंस अपॉन ए टाइम इन मुंबई २ ‘ हा सिनेमा रिलीज होणार आहे. दोघांची नजर सध्या ईदवर आहे.
‘चैन्नई एक्सप्रेस’ आणि ‘वंस अपॉन ए टाइम इन मुंबई २’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी या दोन्हीपण सुपरस्टार्सची पत्नी आमने सामने येत आहेत. ‘चैन्नई एक्सप्रेस’चे प्रमोशन आता गौरी खान करणार असून तिने या सिनेमाच्या पब्लिसिटीची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. तर दुसरीकडे ट्विंकल खन्नाला याची माहिती मिळाल्यानंतर ती पण पति अक्षय कुमारच्या सिनेमाचे प्रमोशन करणार असल्याचे समजते. त्यासाठी तिने आतापासूनच रूपरेषा तयार करण्यास सुरुवात केली आहे. ट्विंकल खन्ना एकेकाळी हीरोइन राहिली असल्याने तिला सध्या चांगला रिस्पोन्स मिळेल असे वाटते.
‘वंस अपॉन ए टाइम इन मुंबई -२ ‘ या सिनेमाचे प्रमोशन ट्विंकल करणार असल्याचे दिग्दर्शक एकता कपूरला समजल्यानंतर ती खूप उत्साहित झाली आहे. त्यामुळे तिने लगेचच ट्विंकल खन्नाला सोबत घेऊन प्रमोशनची रूपरेषा तयार केली आहे.