“तानी”मधून अवतरला नवसाचा वाघ

आजवर रूपेरी पडद्यावर अनेक पात्रं पाहिली असतील, पण लवकरच मराठी
रसिकांच्या भेटीला एक वाघ येणार आहे. हा वाघ आहे नवसाचा. संकटसमयी आणि
बिकटप्रसंगी देवाला नवस बोलून साकडं घालणं आणि आपली मनोकामना पूर्ण
झाल्यावर नवस पूर्ण करणं हा जणू मानवी स्वभावाच आहे. नास्तिकांच्या
बुद्धीला कदाचित हे पटणार नाही, पण देवावर श्रद्धा असलेल्या प्रत्येक
माणूस जीवनात कधी ना कधी तरी नवस बोलतो आणि त्याची पूर्तता ही करतो.
मराठी रसिकांच्या भेटीला येणारा वाघही असाच नवसातून अवतरलेला आहे.

व्ही. पतके फिल्म्सच्या बॅनरखाली आकाराला येणाऱया ‘तानी’ या आगामी
मराठी सिनेमात रसिकांना हा वाघ भेटेल. नेहमीच आशयघन सिनेमांची मेजवानी
रसिकांना देण्याचे व्रत जोपासणाऱया दिग्दर्शक संजीव कोलते यांच्या
दिग्दर्शनाखाली बनणाऱया ‘तानी’चे निर्माते आहेत अजय ठाकूर आणि वंदना
ठाकूर. गायत्री कोलतेच्या कथेवर आधारित असलेल्या ‘तानी’च्या निमित्ताने
दिग्दर्शक संजीव कोलते पुन्हा एकदा नवीन सामाजिक प्रश्नाला वाचा
फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. या सिनेमाची कथा बाप-लेकीच्या भोवती
गुंफण्यात आली आहे. पित्याची म्हणजे शंकरची भूमिका मराठीतील सुप्रसिद्ध
अभिनेते अरूण नलावडे साकारीत असून त्यांच्या मुलीच्या म्हणजेच तानीच्या
भूमिकेत आहे केतकी माटेगावकर.

व्ही. पतके फिल्म्सच्या बॅनरखाली आकाराला येणाऱया ‘तानी’ या आगामी मराठी
सिनेमात रसिकांना हा वाघ भेटेल. नेहमीच आशयघन सिनेमांची मेजवानी रसिकांना
देण्याचे व्रत जोपासणाऱया दिग्दर्शक संजीव कोलते यांच्या दिग्दर्शनाखाली
बनणाऱया ‘तानी’चे निर्माते आहेत अजय ठाकूर आणि वंदना ठाकूर. गायत्री
कोलतेच्या कथेवर आधारित असलेल्या ‘तानी’च्या निमित्ताने दिग्दर्शक संजीव
कोलते पुन्हा एकदा नवीन सामाजिक प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करीत
आहेत. या सिनेमाची कथा बाप-लेकीच्या भोवती गुंफण्यात आली आहे. पित्याची
म्हणजे शंकरची भूमिका मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते अरूण नलावडे साकारीत
असून त्यांच्या मुलीच्या म्हणजेच तानीच्या भूमिकेत आहे केतकी माटेगावकर.

‘तानी’ही विदर्भातील वऱहाडी समाजाच्या जनजीवनाचा प्रवास रेखाटणारी कथा
आहे. वऱहाडी व्यक्तीरेखा, त्यांचा स्वभाव, कुळाचार, संस्कृती तसेच परंपरा
दाखवण्याचा प्रयत्न या सिनेमात दिग्दर्शक संजीव कोलते यांनी केला आहे.
कोलते म्हणतात, “महादेवाचा पोझपासून वऱहाडी समाजातील लोकांच्या घराच्या
उंबरठ्यावर असणाऱया त्रिशुळापर्यंत साऱया बारीक सारीक गोष्टी टिपल्या
आहेत. भारतीय सिनेसृष्टीच्या दैदिप्यमान शंभर वर्षांच्या प्रवासात
वऱहाडच्या चालीरितींबाबत फारशी ओळख रसिकांना करून देण्यात आलेली नाही असं
दुर्दैवानं म्हणावं लागेल. त्याचीच ओळख रसिकांना ‘तानी’मुळे होईल. श्री
गणपतीला, देवीला किंवा ताजुद्दीन बाबाला नवस बोलण्याची परंपरा वऱहाडी
मंडळींमध्ये आहे. तोच धागा पकडून यात वाघात सीन गुंफण्यात आला आहे.
मनातील इच्छा पूर्ण झाल्यास मी गणपती, नवरात्री किंवा ऊरूसाच्या वेळी वाघ
बनून नाचेन असा नवस बोलला जातो. ही परंपरा वऱहाडी मंडळींमध्ये आजही
प्रचलित आहे. ‘तानी’ सिनेमात शंकरच्या भूमिकेत असलेले अरूण नलावडे आपली
मुलगी तानी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास वाघ बनून नाचण्याचा नवस
बोलतात आणि तानी जेव्हा दहावी पास होते तेव्हा ते खरोखर वाघाचे रूप धारण
करून नृत्य करतात असा एक प्रसंग ‘तानी’मध्ये चित्रीत करण्यात आला आहे.
मराठी चित्रपटाच्या इतिहासात किंवा देशातील चित्रपटाच्या इतिहासातीलही हा
पहिलाच प्रसंग आहे. यात कुठेही अतिशयोक्ती नसल्याने तसेच कथेची गरज
असल्याने हा प्रसंग सिनेमात चित्रीत करण्यात आल्याने नलावडेंनी साकारलेला
वाघ रसिकांना नक्कीच आवडेल.”

‘तानी’मधील वाघाच्या दृश्यासाठी अरूण नलावडेंना डोक्याच्या केसांपासून
पायांच्या नखापर्यंत हुबेहूब वाघाप्रमाणे रंगवण्यात आलं होतं. वाघ
रंगवण्यासाठी कलादिग्दर्शक नाना मिसाळ यांना आमंत्रित केलं. त्यांच्या
सांगण्यानुसार नलावडेंच्या शरीराच्या काही भागांवरील केसही काढून
टाकण्यात आले. उग्र चेहरा, अंगावर पिवळे-काळे पट्टे, लाल भडक लांब जीभ,
मोठे दात आणि लांबलचक शेपूट या रूपात अरूण नलावडे हुबेहूब वाघासारखे दिसत
होते. त्यांना पाहिल्यावर अनेकांनी तोंडात बोटं घातली आणि अनाहुतपणे
तोंडून शब्द बाहेर पडले ‘सॉलिड…’ त्यानंतर अरूण नलावडेंनीही अंगात
खराखुरा वाघ संचारल्यासारखं नृत्य केलं आणि लेखकाने कागदावर लिहिलेला वाघ
कॅमेऱयात कैद झाला. वाघाच्या या नृत्यातही काही भाव दडलेले होते.
आनंदातून सुरू झालेलं हे वाघाचं नृत्य एका टॅजिडी मूव्हमेंटवर येऊन
थांबतं.

गायत्री कोलते यांनी या सिनेमाची कथा लिहिली असून संजीव कोलते यांनी
पटकथा-संवादलेखन केले आहे. ‘तानी’मध्ये अरूण नलावडे आणि केतकी माटेगावकर
यांच्यासह विलास उजवणे, देवेन्द्र दोडके, वत्सला पोलकमवार, मदन गडकरी,
मधु जोशी, गीता कोलते, बालकलाकार वेदिका वाईरगडे यांच्या प्रमुख भूमिका
असून डॉ. गिरीश ओक, ईला भाटे हे विशेष भूमिकेत दिसणार आहेत