कर्नाटकातले परिवर्तन

काँग‘ेस पक्षाला कर्नाटकात स्पष्ट बहुमत मिळेल असे अंदाज मतदानोत्तर चाचणीतून प्रकट झाले आहेत. या अंदाजांनुसार या विधानसभेतल्या 224 जागांपैकी 110 ते 115 जागा काँग‘ेसला मिळणार असून या पक्षाचे सरकार सत्तेवर येणार आहे. तसे झाल्यास काँग‘ेस नेत्यांचा आत्मविश्‍वास वाढणार असून ते याच मन:स्थितीत 2014 च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. असे असूनही काँग‘ेसच्या नेत्यांमध्ये म्हणावी तेवढी आनंदाची लाट निर्माण होताना दिसत नाही. खरे तर केन्द्रातले सरकार पराभवाच्या छायेत आहे. सरकारला योग्य ती धोरणे आखता येत नाहीत. एका मागे एक भानगड बाहेर पडत आहे. एका मागे एक मित्र आणि घटक पक्ष काँग‘ेस पक्षाला सोडून जात असून संयुक्त पुरोगामी आघाडी विघटित होत आहे. अशा स्थितीत काँग‘ेसच्या कर्नाटकातल्या विजयाने त्याला संजीवनी मिळणार आहे पण असे असूनही काँग‘ेस नेत्यांना फारसा आनंद झालेला दिसत नाही. पक्षाला प्राणवायू मिळत आहे. अशा वेळी पक्षाला हर्षवायू व्हायला पाहिजे पण त्या ऐवजी पक्षाचे नेते लांब तोंडे करून गंभीरपणे बसली आहेत. या मागचे कारण काय?

खरे तर ही काँग‘ेससाठी पर्वणी आहे. कारण येेथे केवळ काँग‘ेसचा विजयच होत आहे असे नाही तर पक्षाचा कट्टर प्रतिस्पर्धी समजल्या जाणार्‍या भारतीय जनता पार्टीचा आधार चांगलाच खचला असल्याचे दिसणार आहे. भाजपाच्या जागा 112 वरून 50 च्या आसपास होणार आहेत. भाजपाला एवढा मोठा धक्का बसणे हे काँग‘ेससाठी वरदान आहे पण त्याचा फार मोठा आनंद काँग‘ेस नेत्यांना झालेला दिसत नाही. एका वृत्तवाहिनीने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत काँग‘ेसला 110 ते 115 जागा मिळतील असे दिसून आले आहे पण काँग‘ेस पक्षाने स्वत:चे एक सर्वेक्षण केेले होते. त्यातही या पक्षाला 115 जागा मिळतील असे दिसून आले होते. असे असूनही काँग‘ेस नेत्यांची मने मरगळलेली का आहेत ? या मागचे महत्त्वाचे कारण आहे ते आकड्याचे. 224 आमदारांच्या विधानसभेत या पक्षाला जास्तीत जास्त 115 जागा मिळण्याची शक्यता आहे. कोणतीही चाचणी या पक्षाला 115 पेक्षा अधिक जागांचा अंदाज व्यक्त करताना दिसत नाही. 115 जागा मिळाल्या तर भाजपाचा पराभव करून सत्ता मिळवल्याचा आनंद होणार हे नक्की आहे पण 115 ही काही फार सॉलीड पोझिशन नाही. हा अंदाज अगदी चार जागांनी हुकला तरीही विजय मिळाल्याच्या आनंदावर विरजण पडणार आहे.

कारण स्पष्ट बहुमताला 113 जागा लागतात. पक्षाला आता चांगले बहुमत हवे आहे. चार दोन जागा कमी पडून जर काठावरचे बहुमत मिळत असेल आणि तेवढ्या जागांसाठी कोणत्या तरी लहान पक्षाला जवळ करण्याची गरज भासणार असेल तर त्या विजयाचा आनंद तो काय राहिला ? अशा स्थितीत अपक्षांना तरी आळवावे लागते किंवा पाच दहा आमदारांच्या लहान गटाला तरी कुरवळावे लागते. असे दोन गट तिथे संभवतात. पहिला आहे येडीयुरप्पा यांचा तर दुसरा असेल बळ्ळारी जिल्ह्यातल्या खाण सम‘ाट रेड्डी बंधूंचा. हे दोन्ही नेते भाजपातच होते. ते भाजपाचे आधारस्तंभ होते. आता बाहेर पडले आहेत. ते भ‘ष्ट आहेत. निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात काँग‘ेसच्या नेत्यांनी याच दोन नेत्यांना लक्ष्य करून भाजपावर टीका केली होती. आता चार दोन जागा कमी पडल्याने याच नेत्यांच्या नाकदुर्‍या काढाव्या लागणार असतील तर मग विजयाचा आनंद तो काय राहिला? तसा तो राहण्याची शक्यता कमी असल्यामुळेच काँग‘ेसच्या नेत्यांना विजयाचा आनंद उपभोगता येत नाही. देशात आता आघाडीचे राजकारण आहे आणि ते करताना लहान लहान पक्षांना तसेच अपक्षांना सावरून घ्यावे लागतेे. त्या हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या आमदारांच्या तालावर 110 आमदारांच्या पक्षाला नाचावे लागते. या कल्पनेने काँग‘ेसचे नेते नाराज आहेत.
अशा तडजोडीत अपक्षांना सावरून घ्यावे लागते. त्यांना आपल्या आघाडीत टिकवून ठेवण्यासाठी त्यांना कंत्राटे द्यावी लागतात. त्यांंना राजी राखण्यासाठी तोबरे भरावे लागतात. त्यांच्या भ‘ष्टाचाराकडे दुर्लक्ष करावे लागते. आपला म्हणून कसलाही विकास कार्यक‘म राबवता येत नाही. म्हणून काँग‘ेसचे नेते या सं‘येवर खुष नाहीत. त्यांना हवे आहे आपल्या एकट्याच्या जोरावर स्पष्ट आणि हुकमी बहुमत मिळवणे. तसे नसल्याने अनेक तडजोडी करीत करीत कसलीही प्रगती न करता वाटचाल करावी लागते. सोनिया गांधी यांनी अलीकडे या गोष्टीवर फार विचार सुरू केला अ आहे. 2008 साली राजस्थानात झालेल्या निवडणुकीत काँग‘ेसने भाजपाला हटवून सत्ता काबीज केली पण बहुमताला पाच आमदार कमी पडले. ते बसपातून आले पण त्यांना पावन करून घेता घेता नाकीनव आले. तेव्हाच सोनिया गांधी यांनी विजयाचा आनंद व्यक्त करताना हे पुढचे धोेके लक्षात आणून दिले होते. केवळ राज्यातच नाही तर एकूणच देशात हे धोके आहेत. म्हणून गेल्या 20 वर्षांपासून कोणताच पक्ष स्पष्ट बहुमत मिळवण्याची क्षमता बाळगून नाही.