मुंबई इंडियन्ससाठी कसोटी

मुंबई- गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पराभव स्वीकारवा लागल्याने सलग दोन विजय मिळवून पराभव पत्करावा लागल्याने निराशेचे वातावरण आहे. रविवारी मुंबई इंडियन्सची गाठ चेन्नई सुपर किंगशी पडणार आहे. त्यामुळे या सामन्यातून मुंबई इंडियन्सची पुन्हा एकदा कस लागणार आहे.

गेल्या सामन्यात हैदराबादविरुद्ध मुंबईने ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्यापेक्षा चांगली फलंदाजी त्यांना करावी लागेल. घरच्या मैदानावरील अपराजित ही बिरुदावली कायम ठेवायची असेल तर त्यांना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध आपल्या कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे. सध्या तरी चेन्नईचा संघ सर्वोत्तम आहे. त्यांच्या संघातले सर्वच खेळाडू सातत्याने योगदान देत आहेत. माइक हसी , सुरेश रैना , ढोणी हे जवळपास प्रत्येक सामन्यात धावा ओतत आहेत.

त्या तुलनेत मुंबई इंडियन्सची कामगिरी मात्र सातत्यपूर्ण राहिलेली नाही. रोहित शर्मा व दिनेश कार्तिकचा अपवाद वगळता इतरांकडून अपेक्षित कामगिरी झाल्याचे पाहायला मिळत नाही. दिनेश कार्तिकला तर त्याच्या या कामगिरीचे फळ म्हणून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघात त्याची निवडही झाली. सचिन तेंडुलकर सलग तीनवेळा त्रिफळाचीत झाला त्याला मुंबई इंडियन्सला पुन्हा विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. एकंदरीत या सामन्यातून पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सची कस लागणार आहे.