मुंबई दि. ३- शांघायपेक्षा सहा पट मोठे आणि राजधानी दिल्लीच्या दुप्पट आकाराचे शहर आम्ही गुजराथमधील धोलेरा येथे समुद्र किनार्यावर उभे करतो आहेात. तेव्हा व्यावसायिकांनो, व्यापार्यांनो गुजराथमध्ये या आणि आपला व्यवसाय, उद्योग सुखासमाधानाने करा असे आमंत्रण गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल मुंबईत बोलताना केले. इंडियन मर्चंट चेंबरच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते
सभेला प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या व्यापारी आणि उद्योजकांनी सुरवातीलाच महाराष्ट्राने एलबीटी लागू केल्याने व्यवसाय बंद ठेवला असल्याचे सांगून गुजराथेत आम्हाला थोडी जागा द्या अशी गळ मोदी यांना घातली. त्याला उत्तर देताना मोदी बोलत होते. ते म्हणाले थोडी जागा कशाला? गुजराथेत व्यवसायानिमित्त येणार्या सर्वांना समावून घेईल असे शहर आम्ही उभे करतो आहोत. बिल्डर आणि व्यावसायिकांनी गुजराथेत स्थलांतर करू अशी धमकी त्यांच्या सरकारला द्यायची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूवीही हे अनेकदा घडले आहे.
आपल्या भाषणात मोदी यांनी पुन्हा एकदा गुजराथचे विकास मॉडेल भारताने राबवावे असे प्रतिपादन केले. गुजराथमधील विजयानंतर मोदी यांची मुंबईला ही पहिलीच भेट होती. या कार्यक्रमासाठी दोन हजार प्रेक्षकांची क्षमता असतानाही सात हजारांहून अधिक प्रेक्षक येथे आले होते आणि त्यात सर्वसामान्य व्यापार्यांअपासून ते मोठ्या उद्योजकांपर्यंत सर्वांचा समावेश होता असेही समजते.