जगभरातील तुरुंगात साडेसहा हजार भारतीय

तिरूअनंतपूरम, दि.४ – पाकीस्तानमधील २५४ जणांसह जगभरातील ६७ देशांतील तुरूंगात सुमारे ६ हजार ५६९ भारतीय असल्याचे उघड झाले आहे. केरळमधील माहिती अधिकार कार्यकर्ते आणि वकील डी. बी. बिनू यांना या अधिकारांतर्गत परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती पुरविली आहे. या भारतीयांपैकी सर्वाधिक भारतीय अरब देशांमध्ये आहेत. त्यातही सौदी अरेबियामध्ये सुमारे १६९१ भारतीय आहेत.

त्यानंतर कुवैत (११६१) आणि युएई (१०१२) या देशांचा क्रमांक लागतो. केरळ किनार्‍यावर आपल्या खलांशानी दोघा भारतीय मच्छीमारांच्या केलेल्या हत्येनंतर त्यांच्या अटकेवरून भारताबरोबर राजनैतिक संघर्ष करणार्या  इटालीच्या तुरुंगातही १२१ भारतीय खितपत पडले आहेत. याशिवाय इराण, इराक, अल्जेरिया, बेल्जिअम आणि फ्रान्समध्येही भारतीय कैद्यांचे अस्तित्व आहे.

Leave a Comment