आगामी काळात येत असलेल्या बहुचर्चित ‘रैंबो राजकुमार’ या सिनेमासाठी शाहिद कपूर दिवस- रात्र मेहनत घेत आहे. या सिनेमासाठी शाहिद खूपच कष्ट घेत आहे. त्यामुळेच सिनेमाच्या शूटिंगवेळी एका अपघातातून शाहिद कपूर बचावला आहे.

अभिनेता शाहिद कपूर सध्या प्रभुदेवाच्या एक्शन सिनेमा ‘रैंबो राजकुमार’ मध्ये काम करीत आहे. या सिनेमाची शूटिंग करतेवेळी शाहिद आगीच्या भडक्यातून बालबाल बचावला आहे. या सिनेमाची शूटिंग कमालिस्तान स्टूडियोमधील एका घरात सुरु आहे. त्यावेळेस शाहिद आगीच्या भडक्यात अडकून पडला होता. त्यावेळी त्याच्या अंगावर आग भडकणारे एक केमिकल सुद्धा पडले होते. हे केमिकल गरम असल्याने शाहिदच्या टी शर्टला छिद्र पडले होते. एवडेच नव्हे तर टी-शर्ट काढताना शरीराचा मागील हिस्सा लूज झाला होता. शाहिदच्या पाठीवर जाळलेले जखमा होत्या. डॉक्टरने त्यांना काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
शाहिदच्या आगामी काळात येत असलेल्या ‘ रैंबो राजकुमार’ या सिनेमाची प्रेक्षक वाट पाहत आहेत. या सिनेमात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा शाहिदच्या अपोजिट झळकणार आहे. त्यासोबतच शाहिद राजकुमार संतोषीच्या ‘फटा पोस्टर निकला हीरो’ या सिनेमात इलियाना डीक्रूज सोबत दिसणार आहे. या सिनेमाचे प्रदर्शन २३ ऑगस्ट रोजी होणार आहे.